रत्नागिरी : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयने बीएसएनएलचे अतिरिक्त महासंचालक प्रभाकर पाटील यांच्या रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील कार्यालयांवर छापा टाकला. त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
BSNLचे अतिरिक्त महासंचालक प्रभाकर पाटील यांनी याआधी सीम कार्ड घोटाळा केला आहे. तसेच रत्नागिरी आणि कोल्हापूरमधून अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील कार्यालयांवर सीबीआयनं छापे टाकलेत. पाटील यांच्यावर यापूर्वीच सिमकार्ड घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आलाय.
आज त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयनं एकाच वेळी छापा टाकला. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आलीये.. या घोटाळ्यातून पाटील यानं कोट्यवधींची माया जमा केल्याचा संशय आहे.
पाहा व्हिडिओ :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.