पुणेकरांनो, सावधान! शहरात फिरतायेत पोलिसाच्या वेशात भामटे

पुणेकरांनो, जरा सावधान... एखाद्या सिग्नलवर तुम्हाला अडवलं आणि ट्रॅफिक पोलिसानं पावती फाडायला घेतली... तर आधी खात्री करा... कारण वाहतूक पोलिसाच्या वेशात भामटे पुणेकरांना गंडवतायेत. 

Updated: Apr 16, 2015, 08:18 PM IST
पुणेकरांनो, सावधान! शहरात फिरतायेत पोलिसाच्या वेशात भामटे title=

पुणे: पुणेकरांनो, जरा सावधान... एखाद्या सिग्नलवर तुम्हाला अडवलं आणि ट्रॅफिक पोलिसानं पावती फाडायला घेतली... तर आधी खात्री करा... कारण वाहतूक पोलिसाच्या वेशात भामटे पुणेकरांना गंडवतायेत. 

राहुल मनोहर नायकवडे आणि अनिल राजेंद्र सुकळे. एक हुबेहूब पोलीस इन्स्पेक्टर तर दुसरा त्याचा साथीदार. तोतया पोलिसांची ही जोडगोळी वारजे पोलिसांनी जेरबंद केलीय. पौडरोडवरच्या वेद भवन चौकात गाड्या अडवून त्यांनी वाहन चालकांकडून पावत्या फाडायला सुरुवात केली. लायसन आहे का?, RCTC आहे का, PUC आहे का, अशा विविध कारणांसाठी त्यांचा पैसे वसुलीचा धंदा सुरु होता. मात्र एका सजग वाहन चालकाला त्यांच्याविषयी शंका आली, आणि त्यांना बेड्या पडल्या. 

वाहतूक पोलिसांच्या कारवाई विषयी शंका आल्यास नागरिकांनी त्यांचं ओळखपत्र मागावे किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलंय. 

एकतर पुण्यातल्या वाहतूक पोलिसांविषयी पुणेकरांचं फारसं चांगलं मत नाही. त्यात असे प्रकार घडू लागल्यावर चोर कोण आणि पोलीस कोण हे ओळखणं खरोखरच अवघड आहे. त्यामुळे पुणेकरांनो, सावध राहा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.