संतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले

येथे सहा वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. यानंतर संतप्त नागरिकांनी महानगर पालिका आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले.

Updated: Nov 25, 2016, 03:33 PM IST
संतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले title=

अहमदनगर : येथे सहा वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. यानंतर संतप्त नागरिकांनी महानगर पालिका आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले.

दरम्यान, याआधी एका मुलाचा कुत्रे मागे लागल्याने रोडवर पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हे संतप्त पाऊल उचलले. आता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. 

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसागणिक वाढत आहे. मागणी करुनही पालिसा प्रशासन लक्ष देत नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. झोपलेल्या पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे नागरिकांनी सांगितले.