"आंदोलनासाठी अण्णा चार्टड विमानाने गेले नाहीत!"

अण्णा हजारे यांनी 23 फेब्रुवारी रोजी भूसंपादन कायद्यातील दुरूस्तीविरोधात दिल्लीत धरणे आंदोलन केलं.  या आंदोलनासाठी अण्णा हजारे चार्टड विमानाने गेल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत, त्यासाठी काही जुने फोटो देखिल वापरले असल्याचं, अण्णांचे समर्थक विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 26, 2015, 04:30 PM IST
"आंदोलनासाठी अण्णा चार्टड विमानाने गेले नाहीत!" title=

नवी दिल्ली : अण्णा हजारे यांनी 23 फेब्रुवारी रोजी भूसंपादन कायद्यातील दुरूस्तीविरोधात दिल्लीत धरणे आंदोलन केलं.  या आंदोलनासाठी अण्णा हजारे चार्टड विमानाने गेल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत, त्यासाठी काही जुने फोटो देखिल वापरले असल्याचं, अण्णांचे समर्थक विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.

सोशल नेटवर्किंगवर फोटो कसे जुने आणि चुकीचे आहेत हे समोर येण्यासाठी, "अण्णांच्या कार्यालयाने अण्णांचा बोर्डींग पास सार्वजनिक केला आहे. सुपारी बहादरांना उत्तर म्हणून तो इथे जोडला आहे. २३ तारखेला एअर इंडियाच्या सकाळच्या पुणे - दिल्ली विमानाच्या सर्वसाधारण श्रेणीत दहाव्या रांगेतील "एफ" या आसनावर बसून अण्णांनी प्रवास केला. सेक्युरिटीचा स्टँप देखील स्पष्ट दिसतोय, " असं विश्वंभर चौधरी यांनी म्हटलंय.

विश्वंभर चौधरी म्हणतात, "फक्त एक आठवण म्हणून सांगतो. अण्णा आणि मी अमेरिकेला जात होतो तेंव्हा प्रथम श्रेणीची जवळपास सर्व आसने रिकामी होती म्हणून एअर इंडियाच्या अधिकार्यांनी अण्णांचे 'अपग्रेडेशन' ऑफर केले होते, अण्णांनी ते नाकारले".

अण्णांच्या कार्यालयाने अण्णांच्या तिकिटाचा फोटो सार्वजनिक केला आहे, यात अण्णा इकोनॉमी क्लासने दिल्लीत आंदोलनासाठी गेले आहेत, यावरून अण्णा चार्टड विमानाने गेले नसल्याचं स्पष्ट होतंय, अण्णा हजारे यांचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी, असे आरोप करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.