नाशिक : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा सात मोबाईल सापडले आहेत. यात फोर जी मोबाईलाचाही समावेश आहे. यासंदर्भात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मंडल क्रमांक 7 च्या बरॅक 3 मध्ये शौचालयाच्या खाली हे मोबाईल लपवले होते. यापूर्वी झी 24 तासनं नाशिकच्या तुरूंगात कैद्यांकडून कसा मोबाईलचा सर्रास वापर याची बातमी याआधीच उघड केली होती.
त्याबाबत जयंत पाटलांनी हिवाळी अधिवेषनादरम्यान शेवटच्या आठवड्यात उल्लेखही केला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्यवर्ती कारगृहात मोबाईल वापरले जात असल्याची बाब उघड झालीय.