पुणे : पुण्यात पाच लाखात घर, या योजनेची नोंदणी आजही सुरूच आहे. चौकशीचे कुठलेही आदेश अजून मिळालेले नसल्याचं पुणे म्हाडाचे सीईओ आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दिलेले चौकशीची घोषणा हवेतच विरली असल्याचं पुढं आलंय.
या योजनेला मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले होते. गिरीश बापट, प्रकाश मेहता या मंत्र्यांबरोबरच मुख्यमंत्र्यांनीदेखील या योजनेच्या चौकशीची घोषणा केली आहे. मात्र त्यांनतरही बिल्डरने घरांसाठी नाव नोंदणी सुरूच ठेवली आहे.
स्वतःच्या कार्यालयाऐवजी आता बिल्डरनं जवळच्या मंगल कार्यालयात ग्राहकांची नोंदणी सुरू केलीय. तसेच पैसे न घेता नाव नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, आधी नाव नोंदणी केलेल्या ग्राहकांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.