नाशिक : लष्करी दलाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या देवळाली कँम्प परिसरात घडलीय. गतीमंद तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी लष्करातील कर्नलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. मात्र, आरोपीला अजूनही अटक झालेली नाही.
कधी डोक्यावरच्या टोपीने तर कधी कमरेच्या काळ्या पट्ट्याने आपला चेहरा लपाविणारा लष्करी अधिकारी कर्नल विनोद सहानी... जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असताना गोळीबारात जखमी झालेला, लष्करात काम करून ताठ मानेनं जगण्यापेक्षा तोंड लपविण्याची वेळ त्याच्यावर आलीय. त्याला कारण ठरलाय तो त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा... देवळाली कँम्पमध्ये राहणाऱ्या या कर्नलने २३ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केलाय.
३० एप्रिलला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी मुलीची विचारपूस केल्यानंतर शुक्रवारी रात्री देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्नलला देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पण, एरव्ही संशयितांना कुठलीही खातरजमा न करता अटक करणाऱ्या पोलिसांनी कर्नलच्या बाबतीत मात्र बरीच ढिलाई दाखवलीय. माध्यमांना याविषयी माहित द्यायलाही स्थानिक अधिकारी टाळाटाळ करतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.