कोल्हापूर : जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचाऱ्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली.
पुणे-बंगळुरु महामार्गावरच्या किणी टोलनाक्यावरून पैलवान कोल्हापूरकडे जात होते. त्यांच्याकडे कर्मचा-यांनी टोल मागितला. मात्र आपण कुस्ती खेळायला गेलो असल्याचं सांगत, त्यांनी टोल द्यायला नकार दिला. त्यावरुन बाचाबाची झाली.
चिडलेल्या या पैलवानांनी शहरातून इतर पैलवानांना बोलावून घेतलं. त्यानंतर टोल कर्मचा-यांना बदडून काढलं. या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाण करणाऱ्या पैलवानांचा शोध घेतला जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.