कल्याणमध्ये आणखी एका पोलिसावर हल्ला

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. आंबिवली जवळच्या मोहनेमध्ये पोलीस हवालदार असलेल्या उत्तम अडसुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

Updated: Sep 12, 2016, 08:23 AM IST
कल्याणमध्ये आणखी एका पोलिसावर हल्ला title=

कल्याण : पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. आंबिवली जवळच्या मोहनेमध्ये पोलीस हवालदार असलेल्या उत्तम अडसुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

आंबिवली जवळच्या मोहनेमध्ये पोलीस हवालदार असलेल्या उत्तम अडसुळ यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. अडसूळ त्यांच्या घराजवळच त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन जात होते. त्यावेळी अचानक हल्लेखोर पाठीमागून आला. त्याने प्लास्टिकच्या पिशवीत लपविलेला लोखंडी रॉड बाहेर काढला आणि रॉडनं हवालदार अडसुळ यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात हवालदार अडसुळ गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोराने पळ काढला. 

खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी सचिन शेडगे नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केलाय. या संदर्भात पोलीस ठाण्यात विचारले असता अदखलपात्र गुन्हा आहे. आरोपी पकडला जाईल, असं उत्तर देण्यात आलं.