नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर माजी मंत्री गणेश नाईकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याआधी भाजप याविरोधात उतरलं होतं. तोपर्यंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक हे गप्प होते. मात्र, आता त्यांनी याविरोधात आंदोलन करण्याचे सूतोवाच केलं आहे.
तुकाराम मुंढे करत असलेल्या कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना त्याचा त्रास होतो यामुळे आता राष्ट्रवादीही या विरोधात रस्त्यावर अहिंसेच्या मार्गानं उत्तर देणार असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलं आहे.
मुंढेंच्या हुकुमशाही कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कायदा लोकशाही पध्दतीनं राबवावा.. हुकुमशाही चालणार नाही असंही गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.