कन्हैय्या कुमारवर नागपूरमध्ये बजरंग दलाचा हल्ला

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यावर महाराष्ट्रात हल्ला करण्यात आलाय. 

Updated: Apr 14, 2016, 11:34 AM IST
कन्हैय्या कुमारवर नागपूरमध्ये बजरंग दलाचा हल्ला title=

नागपूर : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यावर महाराष्ट्रात हल्ला करण्यात आलाय. 

नागपूरमध्ये दाखल झालेल्या कन्हैय्या कुमारच्या गाडीवर काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येतंय.

कन्हैय्यावर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या महिन्यातही जेएनयूमध्ये एका तरुणानं कन्हैय्या कुमारच्या थोबाडात लगावली होती... तसंच शिव्याही दिल्या होत्या. कन्हैय्याला धडा शिकवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचं त्यानं म्हटलं होतं. यापूर्वी हैदराबादमध्ये कन्हैय्यावर बूट फेकण्यात आला होता.