भंडारा: भंडाऱ्यात एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असताना तिच्यावर विळीनं हल्ला करण्यात आला. या घटनेत या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.
आरोपी देवा गमनं याला अटक करण्यात आलीय. आरोपी हा विवाहित असून अनेक दिवसांपासून तो या विद्यार्थिनीला त्रास देत होता. विद्यार्थिनीनं याबाबत आपल्या पालकांकडे तक्रार केली होती. मुलीच्या वडिलांनीही या आरोपीला चोप दिला होता. मात्र तरीही तो सुधारला नाही. अखेर सकाळी नऊच्या सुमारास या आरोपीनं या विद्यार्थिनीवर विळीनं हल्ला केलाय.
अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या केल्यानंतर हत्येनंतर आरोपीनं पोलिसांत आत्मसमर्पण केलं आहे.
मुलगी आसगावमधे अकरावीत शिकत होती. आज सकाळी 8.30 वाजता ही धक्कादायक घटना घडली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.