बुलढाणा : राज्यात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी विचित्र युती दिसत असताना बुलढाण्यात मात्र वेगळं चित्र दिसून आलं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूनं घेत सेनेला दे धक्का दिलाय.
बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या उमाताई तायडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगलाताई रायपुरे विजयी झाल्या आहेत. बुलढाणा झेडपीमध्ये सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना सत्ता स्थापन करतील असा अंदाज होता.
परंतु कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत सेनेला सत्तेपासून दूर सारलं आणि राष्ट्रवादीसोबत भाजपनं सत्ता स्थापन केली. दोन अपक्षांचा देखील भाजपला पाठिंबा मिळाला.