'शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना'-राणे

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना सुरू आहे, तसेच राज्याचे मुख्यमंत्री थापा मारतात, आणि उद्धव ठाकरे यांना कुणीही विचारत नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.

Updated: Aug 30, 2015, 11:17 PM IST
'शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना'-राणे title=

ठाणे :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना सुरू आहे, तसेच राज्याचे मुख्यमंत्री थापा मारतात, आणि उद्धव ठाकरे यांना कुणीही विचारत नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.
 
यावेळी भाजप आणि शिवसेनेवर घणाघाती टीका करतांना नारायण राणे म्हणाले, 'सरकारमध्ये उद्धव ठाकरेंना कोणीच विचारत नाही, जैतापूर प्रकल्प बंद करण्याची भाषा करणारी शिवसेना मागे पडली आहे. शिवसेनेला डावलून भाजपकडून वेगळ्या विदर्भाची तयारी सुरु आहे'.

राणेंनी नेहमीप्रमाणे काँग्रेसलाही घरचा आहेर दिला. 'आंदोलन करण्यासाठी काँग्रेसकडे खूप विषय आहेत. जर आंदोलनासाठी कुणी मोठा नेता नाही आला तर मला बोलवा' अशी शेलकी टीका करत राणेंनी स्वतःच्याच पक्षाला चिमटे काढण्याचा प्रयत्न केला.
 
'चारा छावण्या उभारण्यासाठी कोणी पुढाकार घेताना दिसत नाही' या शब्दांत राणेंनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. ठाण्यात झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणे बोलत होते.

दुष्काळावर उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत असून ५ महिन्यांपासून टँकरची बिलं दिली नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.