भाजपच्या या आमदाराने पगारवाढ नाकारली

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचा पगार वाढ व्हावा यासाठी याबाबतचं विधायक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झालं. यानंतर पगारवाढीवर अनेकांकडून टीका होऊ लागली.

Updated: Aug 8, 2016, 10:21 AM IST
भाजपच्या या आमदाराने पगारवाढ नाकारली title=

मुंबई : महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचा पगार वाढ व्हावा यासाठी याबाबतचं विधायक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झालं. यानंतर पगारवाढीवर अनेकांकडून टीका होऊ लागली.

आता आमदारांचं मासिक वेतन दीड लाखांपर्यंत जाणार आहे, तर निवृत्त आमदारांना 50 हजार रुपये वेतन मिळणार आहे. पगारवाढीचं एकीकडे शरद पवार यांनी समर्थन केल्यानंतर भाजप आमदार श्रीकांत देशपांडेंनी मात्र पगारवाढ नाकारली आहे.  

श्रीकांत देशपांडे हे अमरावतीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. विधानपरिषद अध्यक्षांना त्यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे. मानधनात वाढ केल्याचा देशपांडेंनी निषेध केला आहे. 

आश्रम शाळांसाठी फंड नाही, पेंशनसाठी फंड नाही, नॉन ग्रँटच्या शिक्षकांना १५ वर्षापासून पगार नाही. त्यांची दुरावस्था आहे त्यामुळे त्यांनी पगारवाढ नाकारली आहे.