पुणे : फरासखाना येथे स्फोट होऊन तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नेमका हा स्फोट कशाने झाला याची माहिती हाती आलेली नाही. दरम्यान, या ठिकाणी बोम्बविरोधी शोध पथक दाखल झाले आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये दुपारी कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये पोलीस हवालदार खेडकर आणि हातगाडीवर काम करणारा एक कामगार यात जखमी झालेत. या स्फोटात दोन दुचाकी गाड्याचे नुकसान झाले. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फरासखाना येथील पोलीस स्टेशनजवळील पार्किंगमध्ये हा स्फोट झाल्याने काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.