चंद्रपूर : जंगलांच्या संरक्षणासाठी सरकारने अतिशय कडक कायदे केल्याचा दावा केला असला तरी राजकीय संरक्षण लाभलेले लोकं कशा प्रकारे सर्व कायदे धाब्यावर बसवतात याचा उत्तम नमुना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलाय.
वेळवा या गावातील सरपंचाने वनजमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी तब्बल १५ एकरवर असलेल्या १८०० झाडांची कत्तल केलीये मात्र तरीही या सरपंचावर अजून कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
गावातील जणावरांच्या चराईसाठी आरक्षित असलेलं जंगल उध्वस्त झाल्यानं इथले ग्रामस्थ चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले. आणि अखेर ग्रामस्थांच्या एकीमुळे सरपंच अजय लोणारे यांना या वनजमिनीवरचा आपला दावा परत घ्यावा लागला.
मात्र १८०० च्या वर झाडांची झालेल्या कत्तलीकडे वनविभागाने सोयीस्करपणे कांना-डोळा केलाय. डिसेंबर मध्ये झाडांची कत्तल झाल्यावर तब्बल ४ महिन्यांनी म्हणजे मार्चमध्ये मौका पंचनामा करण्यात आला. मात्र सरपंचावर कारवाईच्या नावावर अजून काहीही झालेले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.