वाघाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन

वाघाच्या तावडीत अडकलेल्या दोन ग्रामस्थांना वनविभागाने अजब शक्कल लावून जीवदान दिले. गोपीनाथ कुडमेथे आणि किशोर मढावी हे दोघेजण गाईचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी एक वाघिण आपल्या दोन बछड्यांसह अचानक त्यांच्यापुढे येऊन उभं ठाकली. त्यावेळी पिलांच्या रक्षणासाठी वाघिण या दोन्ही ग्रामस्थांच्या अंगावर चाल करुन गेली. 

Updated: Nov 23, 2016, 10:26 AM IST
वाघाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन title=
संग्रहित छाया - Tadoba forest

चंद्रपूर : वाघाच्या तावडीत अडकलेल्या दोन ग्रामस्थांना वनविभागाने अजब शक्कल लावून जीवदान दिले. गोपीनाथ कुडमेथे आणि किशोर मढावी हे दोघेजण गाईचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी एक वाघिण आपल्या दोन बछड्यांसह अचानक त्यांच्यापुढे येऊन उभं ठाकली. त्यावेळी पिलांच्या रक्षणासाठी वाघिण या दोन्ही ग्रामस्थांच्या अंगावर चाल करुन गेली. 

भेदरलेल्या दोन्ही ग्रामस्थांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच्या झाडाचा आश्रय घेतला. दोघंही झाडावर चढले आणि वाघिण जाण्याची वाट पाहू लागले. मात्र काही केल्या वाघिण तिथून हटेना. झाडाखाली वाघीण आणि झाडावर हे दोन ग्रामस्थ अशी विचित्र परिस्थिती होती. सुदैवानं जंगलात मोबाईलची रेंज असल्याने दोघांनी इतर ग्रामस्थांना फोन करुन सगळी परिस्थिती सांगितली.

यानंतर दोघांची सुटका करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचले. मात्र वाघिण असल्याने या दोघांना खाली कसं उतरवायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. अखेर वनविभागाने या दोघांनाही जेसीबीच्या मदतीने खाली उतरवण्याचा निर्णय घेतला. खाली वाघीण आणि हवेत जेसीबीचा पंजा आणि त्या पंजात हे दोन ग्रामस्थ अशा चित्तथरारक स्थितीत हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडले.