औरंगाबाद : जिल्ह्यातील देऊळगाव बाजार या गावामध्ये हृद्य पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. अर्जुन इंगळे या ३९ वर्षाच्या व्यक्तीला त्याच्याच सख्ख्या भावानं गेल्या २० वर्षांपासून एका खोलीत डांबून ठेवलंय.
व्हिडीओ पाहा, बातमीच्या सर्वात खाली
सिल्लोड तालुक्यातील देऊळगावच्या बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर एका खोलीतला हा प्रकार आहे. अर्जुनला बंदी करणारा भाऊ राजेंद्र इंगळे हा गावचा पोलीस पाटील आहे. गेल्या २० वर्षांपासून अख्ख्या गावाला याची माहिती असली, तरी कुणी बाहेर सांगण्याचे धाडस केले नाही.
अर्जुनची आई त्याला दररोज खिडकीतूनचं जेवण देते. याच खोलीत जेवण आणि नैसर्गिक विधी करीत आहे. अतिशय दुर्गंधयुक्त खोलीमध्ये राहणाऱ्या अर्जुनचे नखं, केस वाढले आहेत. मात्र त्याच्या भावांनी आजपर्यंत त्याची सुटका केली नाही.
शेतीच्या वादातून भावाने बंदिस्त केल्याचं गावकऱ्यांच म्हणणे आहे. विशेष म्हणजे अर्जुन इंगळे हा दहावीपर्यंत शिकलेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.