मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला

शुल्लक बाबीवरून एका व्यापा-यावर तलवारीने हल्ला करण्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीय.

Updated: Oct 27, 2015, 05:58 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला  title=

नागपूर : शुल्लक बाबीवरून एका व्यापा-यावर तलवारीने हल्ला करण्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीय.

नागपूरच्या सीताबर्डी भागात हा प्रकार घडला. त्रिमुर्ती इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानातून एका व्यक्तीने पेन ड्राईव्ह विकत घेतला. पण पेन ड्राईव्ह चालत नसल्याची तक्रार घेऊन तो दुकानात आला.

दुकानात पेन ड्राईव्ह व्यवस्थित चालत असल्याचं उघड झालं. त्यावरून दुकानदाराची ग्राहकाशी वादावादी झाली. त्यावर चिडलेल्या ग्राहकाने थेट तलवारीने दुकानदारावर हल्ला केला. 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. हल्ला झालेल्या दुकानदाराचं नाव प्रशांत नानवानी असं आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा नागपुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.