माजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार

देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे. 

Updated: Apr 30, 2015, 01:08 PM IST
माजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार title=

चंद्रपूर : देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे. 

राज्यात सेवा करणा-या माजी सैनिकांना आजपर्यंत राज्याची पेन्शन मिळत नव्हती. मात्र देशसेवेला सलाम म्हणून राज्य सरकारने एक अध्यादेश काढून या माजी सैनिकांना राज्याची पेन्शन लागू करण्याचे निश्चित केले आहे. 

चंद्रपुरात आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह, उत्तम विश्रामगृह, आणि परमवीर पुरस्कार प्राप्त वीरांच्या नावानं स्मारक बांधण्याच्या कामाला गती दिली जाईल अशी माहिती, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.