कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार

मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेवर कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार झालेत. हे सर्वजण नागपूरचे आहेत. हा अपघात सकाळी ११ ते १२च्या दरम्यान झाला.

Updated: May 30, 2015, 02:56 PM IST
कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार title=

नागपूर : मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेवर कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार झालेत. हे सर्वजण नागपूरचे आहेत. हा अपघात सकाळी ११ ते १२च्या दरम्यान झाला.

ठार झालेल्यांमध्ये २ एमआरचाही समावेश असल्याचं समजतंय. छिंदवाड़ा ते अमरवाड़ा नागपूर रोडवर चुंगवानी या गावाजवळ हा भीषण अपघात झाला. 

छिंदवाडामध्ये मेडिकल कॅम्पसाठी हे डॉक्टर्स गेले होते. तिथून परत येत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.