रंकाळा जवळच्या इराणी खाणीत कार पडली

रंकाळा तलावाच्या शेजारी असलेल्या इराणी खाणीत कार पडली.  ही कार सांगली जिल्ह्यातील तासगावची असल्याची माहिती मिळाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 25, 2016, 06:48 PM IST
रंकाळा जवळच्या इराणी खाणीत कार पडली title=

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या शेजारी असलेल्या इराणी खाणीत कार पडली.  ही कार सांगली जिल्ह्यातील तासगावची असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात राहुल बजरंग जाधव आणि त्यांची ३ वर्षाची शर्वरी नावाची मुलगी मृत्युमुखी पडले आहेत. तब्बल 4 तासाच्या प्रयत्नानंतर या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

राहुल जाधव यांचे संपूर्ण कुटुंब शिक्षकी पेशातील आहेत. कोल्हापुरात असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी राहुल हे आई आणि मुलीला घेऊन आले होते. 

आईला बहिणीजवळ ठेवून राहुल आपल्या मुलीसह मित्राला भेटण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे.