औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकरांविरोधात आर्थिक अपहार केल्याबद्दल खेरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठवाडा मित्र मंडळाला देण्यात आलेल्या जमिनीचा 1 कोटी 25 लाख रुपये आणि 3 लाख 69 हजार चौरस फुट बांधकाम क्षेत्रफळाचा आर्थिक फायद्यासाठी वापर केल्याच्या आरोपाखाली माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्याविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकारणी निलंगेकरसह यांच्यासह में. समृद्धि आर्केड प्रा.लि. में. अग्रवाल कस्ट्रक्शन कंपनी आणि कंपनीच्या भागीधारांविरोधातही 28 फेब्रुवारीला गुन्हा नोंद करण्यात आली आहे. मराठवाडा जनतेच्या हितासाठी मंडळाने शासनाकडून खेरवाडी परिसरातील चेतना महाविद्यालयासमोरील एक जागा नाममात्र दराने घेतली होती.
त्या जागेठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमबीए महाविद्यालय आणि वस्तीगृह उभारण्याचा मानस होता. मात्र ती जागा शिवाजीराव निलंगेकर यांनी विक्री केल्याचा आरोप सेक्रेटरी मोहनराव देशमुख यांनी केला.