भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

आज भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान होतंय. या पार्श्वर्भूमीवर परिसरात एका गाडीत तब्बल साठ लाख रुपये पोलिसांना सापडलेत.

Updated: May 24, 2017, 08:36 AM IST
भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश title=

भिवंडी : आज भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान होतंय. या पार्श्वर्भूमीवर परिसरात एका गाडीत तब्बल साठ लाख रुपये पोलिसांना सापडलेत.

ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलीय. कल्याण रोडवरील साईबाबा नाका इथं ही कारवाई करण्यात आलीय. 

नाकाबंदी दरम्यान आचारसंहिता पथकाचे डॉ. सुनील भालेराव यांनी ही कारवाई केलीय. भिवंडी पालिकेसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला ही रोकड सापडलीय.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ही रोकड असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, कारच्या नंबर प्लेटवर शिवसेनेचा झेडा असल्यानं याचं गूढ वाढलंय.