पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.

Updated: Dec 7, 2016, 08:49 PM IST
पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक गुंतवणूक मंडळांने पुणे मेट्रोला मंजुरी दिली होती. पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 16.59 किलोमीटरचा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा मार्ग असेल. तो पूर्ण होण्यास चार वर्षे लागतील. या मार्गावर 15 स्थानके असतील. तर पाच किलोमिटर भुयारी मार्ग असेल. पुणे मेट्रोसाठी प्रवासभाडे किमान दहा रुपये आणि कमाल 50 रुपये असेल. 

दुसरा कॉरिडॉर ( दुसऱ्या टप्प्यात) हा कोथरूड भागातील वनाज ते येरवडा भागातील रामवाडीपर्यंत असेल. 14.7 किलोमीटरच्या या मार्गावर 16 स्थानके असतील.मात्र हा संपूर्ण मार्ग जमिनीवर असेल. दुसरा कॉरिडॉर पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागेल. मेट्रोसाठी 12 हजार 298 कोटींचा खर्च मेट्रोच्या या संपूर्ण प्रकल्पासाठी 12 हजार 298 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारचा 20 टक्के हिस्सा (2118 कोटी रुपये तर 20 टक्के हिसा (2430 कोटी रुपये) महाराष्ट्र सरकारचा असेल. 

तर स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांचा दहा टक्के (1278 कोटी रुपये) असेल तर 50 टक्के रक्कम (6325 कोटी रुपये) कर्जातून उभारली जाईल. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) पुणे मेट्रोचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.