चेन स्नॅचिंग, घरफोड्या : पोलीस निष्प्रभ, असहाय्य जनता

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटनांनी धुमाकूळ घातलाय. मंगळसूत्र चोरीच्या घटनांत दुप्पटीने वाढ झालीय.

Updated: Mar 12, 2015, 12:36 PM IST
चेन स्नॅचिंग, घरफोड्या : पोलीस निष्प्रभ, असहाय्य जनता title=

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटनांनी धुमाकूळ घातलाय. मंगळसूत्र चोरीच्या घटनांत दुप्पटीने वाढ झालीय.

ठाणे शहर आणि उपनगरात महिलांनी दागिने घालून बाहेर पडायचे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण मंगळसूत्र चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस दुपट्टीने वाढ झाल्याचं समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसतंय.  

  • २०१२ साली ५६९ मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या. यापैंकी ४५ टक्के गुन्हे उघडकीस आले. 

  • २०१३ साली मंगळसूत्र चोरीचे ८०८ मंगळसूत्र गुन्हे घडले. यापैंकी, फक्त ३६२ गुन्हे उघडकीस आले. 

  • तर, २०१४ साली ९७६ मंगळसूत्र चोरीचे गुन्हे घडले. यापैंकी फक्त ३०२ गुन्ह्यांची उकल झालीय.

या आकडेवारी वरुन एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे चोर मंगळसूत्र चोरतात. त्यापेक्षा सरासरी ३० टक्क्यांनी पोलीस मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांची उकल करतात. 

म्हणजे मंगळसूत्र चोरीचे गुन्हे रोखणे तर दूरच पण घडलेल्या घटनांनी उकल करण्यात ही ठाणे पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.