लातूरमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या डोक्यात घातली खूर्ची, विद्यार्थी गंभीर

परीक्षेत कमी गुण पडल्याची तक्रार केल्यामुळे शिक्षकाने चक्क खूर्ची घालून विद्यार्थ्याचे डोकेच फोडले. या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेय.

Updated: Dec 10, 2015, 10:44 PM IST
लातूरमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या डोक्यात घातली खूर्ची, विद्यार्थी गंभीर title=

लातूर : परीक्षेत कमी गुण पडल्याची तक्रार केल्यामुळे शिक्षकाने चक्क खूर्ची घालून विद्यार्थ्याचे डोकेच फोडले. या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेय.

लातूर शहरातील या घटनेने खळबळ उडालेय. शिक्षकांने विद्यार्थ्याच्या डोक्यात खूर्ची घातल्याने विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लातूरच्या शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारा आकाश पिटले याला प्रथम सत्र परीक्षेत भूगोल विषयात चाळीस पैकी ३४ गुण पडल्यामुळे नाराज होता. त्याने भूगोल विषयाचे शिक्षक प्रकाश निला यांच्याकडे पेपर पुनरतपासणीची मागणी केली. मागणी करूनही ती मान्य होत नसल्यामुळे आकाशने याचा पाठपुरावा केला. त्यामुळे चिडलेल्या शिक्षकाने आकाशच्या डोक्यात चक्क खूर्ची घातली, तसा आरोप त्याने केलाय.

या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाची बाजू घेत अनावधनाने लागले असल्याचे म्हटले आहे. तर आकाश पिटले कुटुंबियाचा तक्रार अर्जावरून लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी या शिक्षकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.  

मारहाण करणारा शिक्षका सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. हा शिक्षक सापडला नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.