नवी मुंबई : येथील एका रिक्षा चालकाचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. रिक्षा चालक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, रिक्षा चालकाचे अपहरण करुन त्याला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ हा या रिक्षा चालकाच्याच मोबाईल वरूनच व्हायरल झालाय.
मछिंद्र भोईर अस या रिक्षा चालकाचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी ७ वाजणाच्या दरम्यान ही घटना घडली. हा रिक्षा चालक सिवूडसमधून प्रवासी घेऊन उलवेमध्ये गेला होता.तिथून चार प्रवाशाना घेऊन तो बेलापूरकडे निघाला होता. मात्र तो बेलापूरला पोचलाच नाही. त्याच्या घरच्यांसह रिक्षाचालकांनी मछिंद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काहीही माहिती मिळाली नाही. सायंकाळी ७ च्या सुमारास रिक्षा चालकाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर मछिंद्र भोईरचा एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये मछिंद्रला प्रचंड मारहाण झाल्याचे दिसत आहे. या व्हिडि मध्ये मछिंद्रने आपल्याला चार इसमांनी बेदम मारहाण केल्याच सांगितलंय.
या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र २४ तास झाले, तरी मछिंद्र चा काहीही शोध लागलेला नाही. यामुळे रिक्षा चालकांमध्ये संतप्त भावना आहे. मछिंद्रचा शोध पोलिसांनी नाही लावला तर उद्यापासून बेमुदत बंद करण्याचा इशारा रिक्षा यूनियनने दिला आहे. दरम्यान, या व्हीडीओ बाबत पोलीस देखील सतर्क झाले असून, बेपत्ता रिक्षा चालकाच शोध घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.