पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. खंडाळा बोगदा परिसरात मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. पर्याय म्हणून हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा ते अमृतांजन पूल दस्तूरी या भागात जुन्या महामार्गानं वळवली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील दोन लेन पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी तर एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे.
जोवर तंत्रज्ञ येऊन सबंधीत भागाची पाहणी करुन हिरवा कंदील देणार नाही तोवर खंडाळा बोगदा परिसरातील वाहतूक बंद ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे.
दरड कोसळणार नाही यासाठी जिओलॉजीकल अभ्यास करूनच खबरदारीचे उपाय योजले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. मात्र एक्स्प्रेस-वेवर शनिवारीच दरड कोळल्यानं पुन्हा वीकेन्ड हौसी पर्यटक आणि प्रवाशांना फटका बसला आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान फक्त आश्वासनापुरतं मर्यादित न राहता त्याची वास्तविक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.