नाशिक : चेसचा सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर नाशिकचा विदित गुजराथी झालाय. गेल्या काही टुर्नामेंटमधील अव्वल स्कोरिंग पार केल्यानंतर त्याला हा मान मिळाला. महाराष्ट्रतील प्रवीण ठिपसे आणि अभिजीत कुंटेंनंतर तब्बल तेरा वर्षांनी हा मान महाराष्ट्रला मिळालाय.
ग्रँडमास्टरसाठी आवशयक असलेले २५०० गुण कधीच मिळाले असून तिसरा नॉर्म तब्बल पाच वर्षांनी मिळाला.
नागपूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रंडमास्टर स्पर्धेत त्यानं हे स्कोरिंग केलं. रशियात पहिला नॉर्म तर २०११ मध्ये चेन्नईत दुसरा नॉर्म मिळाला होता. २००९ मध्ये तो १४ वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियन झाला होता.
यापूर्वी एशियन ज्युनियर चॅम्पियनशिपचा सहविजेता ठरला होता. तर २००९ ते २०१२ या चार वर्षात तो एजग्रुप नॅशनल चॅम्पियन होता. सध्याचं त्याचं जागतिक स्कोरिंग २६७३ असून देशातील पहिल्या तीन चेस प्लेअर्समध्ये त्याची गणना होतेय.