'भारत माता की जय' वादावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

जे भारत माता की जय म्हणणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

Updated: Apr 3, 2016, 08:31 PM IST
'भारत माता की जय' वादावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण title=

मुंबई: जे भारत माता की जय म्हणणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कोणी जय हिंद, जय भारत किंवा जय हिंदूस्तान म्हणत असेल तर काहीच अडचण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

कोणी भारत माता की जय म्हणायला नकार देत असेल तर आमचा आक्षेप आहे, अशा लोकांचा भारताला तोडण्याचा डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच काही माध्यमं या मुद्द्यावरून वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.