हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेमुळे मराठा शिवसैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विनायकराव भिसे पाटील आणि कार्याध्यक्ष पप्पू चव्हाण पोलीसांच्या ताब्यात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
दोघेही हिंगोली शहर पोलिसांच्या नजर कैदेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मागच्या सभेत मराठा शिवसैनिक संघटनेने रास्तारोको केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्याची सभा होईपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येणार आहे.