उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट

उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 12, 2017, 09:11 PM IST
उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट title=

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय. त्याखालोखाल धुळ्यात 4.2 अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यानंतर नाशिकमध्ये 6 अंशांवर पारा आलाय. तर जळगावात 8 अंशांवर पारा आलाय. 

निसर्ग असो वा नागकिक जो तो या थंडीचा आनंद घेत आहे. नाशिकला गुलशनाबाद असंही ऐतिहासिक काळात नाव होतं. त्या नावाला साजेशी गुलाबाची शेती सध्या बहरलीय. तर फुलशेतीही थंड वाऱ्यांवरती डोलतेय. 

मात्र निफाड तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचं पाणी पळालंय. एवढ्या थंडीमुळे द्राक्षमण्यांवर परिणाम होतोय. गहू हरबरा पिकाला फायदा होतोय पण फळ पिकांना या थंडीचा तोटा होतोय.