कल्याणमध्ये छेडछाडीवरून हाणामारीत १ ठार

कल्याणमधील बापगावमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असून आणखी चार जण जखमी आहेत.

Updated: Sep 7, 2015, 07:04 PM IST
कल्याणमध्ये छेडछाडीवरून हाणामारीत १ ठार title=

कल्याण : कल्याणमधील बापगावमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असून आणखी चार जण जखमी आहेत.

स्थानिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत विनय विश्वकर्मा याचा मृत्यू झाला आहे.

के एम अग्रवाल कॉलेज परिसरात ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

स्थानिकांनी कॉलेजातील मुलींना छेडल्याचा राग आल्याने, कॉलेज युवकांनी स्थानिकांशी वाद घातल्यानंतर, वादाचं पर्यावसन हाणामारीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

तर कॉलेजातील मुला-मुलींना हटकल्यावरून वाद झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.