चक्क पुण्यात गुंडाचा जुगाराचा मॉल, पोलिसांचे दुर्लक्ष

जुगाराचा अड्डा किंवा जुगाराचा धंदा तुम्ही ऐकला असेल. पण जुगाराचा mall, कधी तुम्ही पाहिलाय का? पाहिला नसेल तर कधी ऐकलाय का? हा मॉल आहे पुण्यात. जुगाराचा mall म्हटता येईल असा प्रकार राजरोसपणे इथं सुरु आहे. 

Updated: May 26, 2015, 02:29 PM IST
चक्क पुण्यात गुंडाचा जुगाराचा मॉल, पोलिसांचे दुर्लक्ष title=

पुणे : जुगाराचा अड्डा किंवा जुगाराचा धंदा तुम्ही ऐकला असेल. पण जुगाराचा mall, कधी तुम्ही पाहिलाय का? पाहिला नसेल तर कधी ऐकलाय का? हा मॉल आहे पुण्यात. जुगाराचा mall म्हटता येईल असा प्रकार राजरोसपणे इथं सुरु आहे. 

तोही पोलीस स्टेशनपासून काही मीटर अंतरावर. जुगाराच्या या mall ची एक चित्रफित झी २४ तासच्या हाती लागली आहे. पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील नाईक बिल्डींग मध्ये हा जुगाराचा मॉल सुरु आहे. येथून खडकमाळ पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. 

याठिकाणी मटका, डॉट, चक्री, अंदर - बाहर असे जुगाराचे कित्येक प्रकार एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामुळंच याठिकाणी जुगार खेळण्यासाठी शेकडो लोक जमा होतात. एक नामचीन गुंड हा माल चालवत असल्याचा आरोप जांबुवंत कांबळे यांनी केला आहे. बोपखेलच्या सामान्य नागरिकांवर पोलिस अमानुष लाठी हल्ला करतात. तशीच कठोर कारवाई अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलीस कधी करणार. असा सवाल त्यांनी केला आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.