पुणे : पुण्यात आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत विश्वजित कदमांच्या घरी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीच्या विषयाबद्दलय बैठकीत चर्चा करण्यासाठी प्रथमच पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले.
दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादीनं काँग्रेसला 162 पैकी 53 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यापेक्षा अधिक जागा देऊ शकत नाही त्यामुळे आता निर्णय काँग्रेसनं घ्यावा अशी भूमिका राष्ट्रवादीनं या बैठकीत मांडली.. त्यामुळे आता आघाडीचा निर्णय काँग्रेसच्या हाती आहे.