पंकजा मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक

धनंजय मुंडे हे आज सकाळी भगवान गडावर दर्शनासाठी गेले होते, भगवान गडावर जात असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी  त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे, यामुळे धनंजय मुंडे हे भगवान गडावर दर्शन न घेताच परतले असल्याचंही बोललं जात आहे. 

Updated: Jan 5, 2015, 01:30 PM IST
पंकजा मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक

भगवानगड : धनंजय मुंडे हे आज सकाळी भगवान गडावर दर्शनासाठी गेले होते, भगवान गडावर जात असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी  त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे, यामुळे धनंजय मुंडे हे भगवान गडावर दर्शन न घेताच परतले असल्याचंही बोललं जात आहे. 

धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत.धनंजय मुंडे यांनी मागील वर्षी भाजपसोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, तसेच पंकजा मुंडे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली. यात ते पराभूत झाले आहेत, धनंजय मुंडे सध्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षाचे नेते आहेत.

भगवानगड हे ठिकाण अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर आहे, भगवानगडाचा पायथा अहमदनगर जिल्ह्यात तर वरचा भाग हा अहमदनगर जिल्ह्यात येतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.