धरणांच्या जिल्ह्याला टँकरने पाणीपुरवठा

 धरणांचा जिल्हा अशी नाशिकची ओळख... पण आता नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 9, 2017, 09:20 PM IST
धरणांच्या जिल्ह्याला टँकरने पाणीपुरवठा title=

नाशिक : धरणांचा जिल्हा अशी नाशिकची ओळख... पण आता नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू झालाय. जिल्ह्यातील धरणसाठ्यात मागील वर्षापेक्षा दुप्पटीने पाणीसाठा शिल्लक असला तरीही ग्रामीण जनतेच्या घशाला कोरड पडू लागलीय. 

प्रकल्पांचा समावेश आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाणीसाठाही दुप्पट आहे. तरीही नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, बागलाण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. जिल्ह्यातल्या विविध गावात टँकरची मागणी वाढायला लागलीय. 

नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असताना ग्रामीण भागात पाण्याची मागणी पूर्ण केली जात नाहीये. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी गत ग्रामीण जनतेची झाली आहे. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका शेतकरी आणि ग्रामस्थांना बसत असल्याची ओरड केली जातेय.

 ग्रामीण भागातून पाण्याची मागणी होतेय. मात्र प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकल्याने पेठ, सुरगाणा, इगतपुरी, चांगवड या भागातील ही गावं तहानलेली आहेत. तर जिल्हा प्रशासन मात्र सुयोग्य नियोजन केलं असल्याचा दावा करतंय. 

जून महिनाअखेरपर्यंत पुरेल एवढं पाणी असल्याने पाण्याचं संकट नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जातोय. तर त्याचवेळी ग्रामीण भागातून पाणी सोडण्यासाठी नागरिक आणि नेतेमंडळींचा दबाव वाढू लागल्याने पाण्याच्या फेर नियोजनाचा आढावा प्रशासकीय स्तरावर घेण्याची गरज व्यक्त होतेय.