दानवेंसाठी एकीकडे आसू तर दुसरीकडे हसू

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी जिल्हा परिषदेतील निवडणूक ही एकीकडे आसू देणारी तर दुसरीकडे हसू देणारी ठरली.

Updated: Feb 23, 2017, 09:02 PM IST
दानवेंसाठी एकीकडे आसू तर दुसरीकडे हसू title=

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी जिल्हा परिषदेतील निवडणूक ही एकीकडे आसू देणारी तर दुसरीकडे हसू देणारी ठरली.

कन्नड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत रावसाहेब दानवें यांची मुलगी आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांचा पराभव झालाय. शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी काजे यांनी पराभव केला. 

तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेल्या रावसाहेब दानने यांची मोठी मुलगी आशा पांडे - दानवे सोयगावदेवी गटातून विजयी झाल्यात. त्या ३८०० मतांनी विजयी झाल्यात. त्यांनी सेनेच्या बाली तळेकर तर काँग्रेसच्या कासाबाई दळवी यांचा पराभव केला. 

एका मुलीचा पराभव तर दुसऱ्या मुलीचा विजय यामुळे दानवे यांच्यासाठी ही निवडणूक एकीकडे आसू तर दुसरीकडे हसू देणारी ठरलीये.