औरंगाबाद : डॉक्टरांचा संप सुरूच असताना औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
गेल्या पाच दिवसाच्या डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनानं आता माणुसकिच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालायात पहाटे चार वाजता एका महिलेची सीझेरियन करुन प्रसुती करण्यात आली.
धक्कादायक म्हणजे, प्रसुती झाल्याबरोबर त्या महिलेला डॉक्टरांचा संप असल्यानं डिस्चार्ज देण्यात आला. दोन तासांची प्रसुत महिला रुग्णालयाबाहेर छोट्या बाळाला घेऊन बसली होती... तिची आई सोबत होती... मात्र डॉक्टरांना दया आली नाही.
अखेर डॉक्टर ऐकत नसल्यानं लहान बाळाला घेऊन महिलेनं बस स्टँड गाठलं. आजूबाजूच्या लोकांनी घाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांना महिलेला दाखल करून घेण्याची पुन्हा विनंती केली... पण, डॉक्टर नाहीत असं कारण घाटीच्या कर्मचारी वर्गानं दिलं.
आता अवघ्या काही तासांच्या बाळा घेऊन ग्रामीण भागातली ही महिला वणवण फिरतेय... तिचं काही बरं वाईट झालं... तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण झालाय.