ठाणे : अंतर्गत वादातून आरपीआय एकतावादीच्या कळव्यातील कार्याध्यक्षाची निर्घून हत्या करण्यात आली.या घटनेत चार जण जखमी झालेत. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.
ही घटना कळव्यातील गोलाईनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घडली आरपीआय एकतावादीचे कार्याध्यक्ष भास्कर कदम यांचे त्याच परिसरात राहणाऱ्या भगवान कांबळे बरोबर शुल्लक कारणावरून भांडण झाले त्यानंतर भास्कर कदम हे आपल्या सहकार्याबरोबर कळवा पोलीस स्टेशनाला जाऊन तक्रार केली.
पोलिसांनी गोलाई नगर येथे जाऊन पाहणी केली असता आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाले होते. थोड्या वेळानंतर पोलीस निघून गेले. काही वेळानी पुन्हा भास्कर कदम आणि भगवान कांबळे यांच्यात वाद सुरु झाला. भगवान यांने कदम याच्यावर सपासप वार केले.या हल्यात त्यांच्यावर जवळपास २७ वार करण्यात आले त्यामुळे भास्कर कदम गंभीररित्या जखमी झाले. या हल्यात त्यांचा मृत्यू झाला.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या सहकार्यांवर वार करण्यात आले. या चार जणांना कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भगवान कांबळे याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केल्या आरोपी वर या पूर्वी ही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.