मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर घातला ट्रक

हिंगोली-अकोला बायपास रोडवर मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर ट्रक घालून लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Dec 3, 2015, 09:56 PM IST

 हिंगोली : हिंगोली-अकोला बायपास रोडवर मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर ट्रक घालून लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. 

स्वतःच ट्रकच्या काचा फोडून ट्रक रस्त्याशेजारील खड्यात घातला. सुदैवाने यात कोणीही यात जखमी झाले नाही. पण यामुळे नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या बाजूला पळावे लागले. 

हा ट्रक हरियाणाच्या पासिंगचा आहे. तो हिंगोलीवरून अकोल्याचे दिशेने निघाला होता. हिंगोली बायपास चौकात याच ट्रक ड्रायव्हरने समोरच्या ट्रकला धडक दिली आणि मुजोरी करीत त्याच ट्रक चालकाच्या अंगावर धावून गेला. पण हा प्रकार नागरिकांनी बघितला असता. या मद्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांकडून चांगलाच प्रसाद खावा लागला.

तो दारूच्या नशेत एवढा तर्र होता की, आपण काय करतो, कुठे आहे याचेही त्याला भान नव्हते. ट्रक खड्यात घातल्यानंतर तो पुन्हा ट्रक घेऊन पळून जाण्याच्या नादात होता. मात्र, नागरिकांनी त्याचा ट्रक अडवला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.