पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांकडून कंपनीची तोडफोड

नोटबंदी आणि नोटकल्लोळमुळे बँकेतून काढण्यात येणाऱ्या पैशाला लागलेल्या निर्बंधाचा फटका उद्योजकांनाही बसतोय. 

Updated: Dec 17, 2016, 08:13 AM IST
पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांकडून कंपनीची तोडफोड title=

ठाणे : नोटबंदी आणि नोटकल्लोळमुळे बँकेतून काढण्यात येणाऱ्या पैशाला लागलेल्या निर्बंधाचा फटका उद्योजकांनाही बसतोय. 

श्रम करूनही पैसा मिळत नाही याचा राग मनात धरून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात एका कंपनीत घडली. 

शरद दरेकर, प्रवीण करडे आणि उमेश कदम यांनी कंपनीत खिडक्यांच्या काचा, टाईल्सही फोडल्या. या तोडफोडप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिघांनाही अटक करण्यात आलंय.