पुणे : पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल ते दापोडीच्या रस्त्याचा वाद चांगलाच पेटलाय. आर्मी कॉलेजनं बंद केलेला हा रस्ता लष्करानं सुरू करावा याकरता ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन चांगलंच चिघळलं. सकाळपासून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनी हजारोंचा जमाव पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाठीमार करत अश्रूधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रामस्थांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली तसंच काही वाहनांचीही तो़डफोड केली.
सध्या बोपखेल मध्ये प्रचंड तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बोपखेल ते दापोडी हा रस्ता लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून जातो. मात्र या रस्त्याचा वाद कोर्टात गेला. कोर्टानं गावक-यांच्या विरोधात निर्णय़ दिल्यानं मिलिट्रीनं लगेचच हा रस्ता बंद केला. त्यामुळं ग्रामस्थांनी या विरोधात आंदोलन केलं. हा रस्ता लष्करान गेल्या आठ दिवसांपासून बंद केल्यामूळ ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.
दरम्यान, भोपकेळ, रामनगर आणि गणेशनगर हे भाग CME च्या पूर्वेला आहेत आणि तिथल्या प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचं आर्मीनं म्हटलंय. या गावातल्या ग्रामस्थांना पुणे-नाशिक हायवे आणि पुणे शहराकडं जाणारा मार्ग खुला असल्याचं आर्मीनं म्हटलंय. त्यामुळं या ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार अडकून पडल्याचा दावा आर्मीनं खोडून काढलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.