भंडारा : समाजात नेत्रदानाबद्दल अनेक भ्रामक गैसमज कायम असून अनेक शिक्षित लोकही मरणोत्तर नेत्रदानासाठी समोर येत नाही. मात्र, भंडारा जिह्यात लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक या गावातील एका कुटुंबानं एक आदर्श ठेवलाय.
भंडारा जिल्ह्यातली लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक गावातल्या या चिमुकलीचं नाव आहे खुशी भेंडारकर. काही दिवसांपूर्वी तिचा आजारपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.. मात्र आपल्या लेकीच्या नावाला सार्थ ठरावं असं कार्य तिच्या पालकांनी केलंय. लाडक्या लेकीच्या निधनानंतर तिचे डोळे दान करण्याचा निर्णय भेंडारकर दाम्पत्यानं घेतला. खुशीच्या मृत्यूनंतरही दोन अंध व्यक्तींच्या जीवनात आनंद आणण्याचं कार्य भेंडारकर कुटुंबीयांनी केलंय.
सामाजिक कार्यकर्ते उद्धव कोरे यांनी भेंडारकर कुटुंबीयांना धीर देऊन नेत्रदानाचं महत्त्व पटवून दिलं. दुःखाचा मोठा कोसळल्यानंतरही दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळावी या हेतूनं भेंडारकर कुटुंबीयांनी घेतलेला डोळस निर्णय नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.