पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसे याचे उददत्तिकरण करणाऱ्या शक्तींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कांग्रेसचे मूक आंदोलन राज्यात सुरु केलेय. राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे काळी पट्टी तोंडाला बांधून धरणे धरण्यात आली.
पुण्यातील आंदोलनाचे नेतृत्व अजित पवार यांनी केले. पुणे येथील रेल्वे स्टेशन जवळील गांधी पुतळा येथे सकाळी १०.३० वाजता आंदोलन करण्यात आले. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांनी पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील गांधीपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक आंदोलन सुरू केलं.
कागल येथे नगराध्यक्षा आशा माने, भैय्या माने, युवराज पाटील आदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं मूक आंदोलन तर दौंड येथील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलनात सहभाग घेतला.
मुंबईतील जुहू येथील आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आ. विद्या चव्हाण, मुनाफ हकीम आदी उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.