शिर्डी : साईबाबा संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती तयार करणा-या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.
साईबाबा संस्थानने तक्रार नोंदविल्यानंतर हैद्राबाद येथील भाविक जवाहर कुमार आणि राजु रेड्डी यांच्या विरोधात शिर्डीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. साईबाबांना सोन्याचे सिंहासन दान करणा-या हैद्राबाद येथील आदीनारायण रेड्डीचा स्विय सहायक म्हणुन शिर्डीत वावरणा-या राजुनेच ही बनावट पावती केल्याचा संशय आहे.
आदीनारायण रेड्डीनांही सह आरोपी करण्याची मागणी शिर्डीतील ग्रामस्थांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.