नागपूर : याकूब मेमनला आज सकाळी फाशी देण्यात आली, याकूबचा आज 53 वा वाढदिवसही होता. याकूबसाठी कुटुंबीयांनी मध्यरात्री त्याच्यासाठी कारागृहात केक पाठवला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे
याकूबचे भाऊ उस्मान आणि सुलेमान हे नागपूरमध्येच मुक्कामी होते. त्याची पत्नी आणि मुलगीही नागपूरमध्येच असल्याचे सांगण्यात येत आहे.
याकूबच्या कुटुंबीयांनी कारागृह अधीक्षकांकडे याकूबसाठी केक पाठविला होता.
याकूब मेमनला आज सकाळी सात वाजता फाशी देण्यात आल्याचं प्रशासनाने जाहीर केलं, फाशी देण्यापूर्वी त्याने कुराण पठण आणि नमाज अदा केल्याचे सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.