खुल्ताबाद : संकटसमयी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा सुरु केलाय. यावेळी खुल्ताबाद इथं कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलंय.
शिवसेना पक्ष आणि सरकार म्हणून बळीराजाला एकटं पडू देणार नसल्याचं उद्धव यांनी सांगितलंय.. यावेळी उद्धव यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी केलीय. बिहारच्या धर्तीवर अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला मदत करा, असं उद्धव यांनी म्हटलंय.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केलीय. इतके वर्ष सत्ता असतानाही आंदोलन कशाला, असा सवाल उद्धव यांनी पवार यांना विचारला. तसंच अजित पवारांना धरणांच्या पाहणीला घेऊन जाऊ नका, असा टोला उद्धव यांनी लगावला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.